महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्षाचा संशयास्पद मृत्यू; दोन वर्षांनंतरही पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह

अकोला शहरातील उमरी भागात राहणारे स्व. डॉ. जय श्रीकृष्णाजी मालोकार, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष होते. दिनांक 30 जुलै 2024 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू नैसर्गिक नसून खून असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवशी अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनादरम्यान आमदार अमोल मिटकरी यांच्याशी संबंधित राडा झाला, त्याच दिवशी डॉ. मालोकार यांचा मृत्यू झाला. या घटनाक्रमामुळे मृत्यूमागे पूर्वनियोजित कट व राजकीय पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

कुटुंबीयांचा आरोप आहे की, हा खूनाचा प्रकार असताना पोलिस जाणीवपूर्वक राजकीय दबावाखाली हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न होणे, जबाब नोंदवून न घेणे आणि पुरावे गोळा न करणे, हे सर्व प्रकार पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

मात्र, या प्रकरणात करण्यात आलेल्या पोस्टमार्टेम तपासणीत शासकीय डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात मृत्यूचे कारण “shock due to multiple injuries on vital organs” असे नमूद असून, मृत्यू हा “unnatural death” असल्याची स्पष्ट नोंद करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. असे असतानाही, शासकीय डॉक्टरांच्या या अहवालाकडे दुर्लक्ष करून पोलिसांनी खासगी डॉक्टरांच्या जबाबालाच प्राधान्य देत तो मान्य केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे तपासाची दिशा एकांगी ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

डॉ. रोहन भगाडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्यांच्या रुग्णालयातील CCTV कॅमेरे त्या दिवशी तांत्रिक कारणामुळे बंद (खराब) होते. तसेच, ECG मशीनही त्याच दिवशी खराब झाल्याने ECG रिपोर्टवरील वेळ व नोंदी अचूक राहिल्या नसल्याचे त्यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे. याच जबाबात जय मालोकार यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते जमिनीवर कोसळले व त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला, असेही डॉ. भगाडे यांनी स्पष्ट केल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

या प्रकरणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षप्रमुखांनी मालोकार कुटुंबीयांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र आज दोन वर्षे उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ही आश्वासने फोल ठरल्याचे दिसून येत असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणी संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर IPC 304A (मृत्यूस कारणीभूत निष्काळजीपणा) व 338 (गंभीर दुखापत) अंतर्गत गुन्हा दाखल करून निष्पक्ष, स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू असल्याने, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

 

अन्य खबरे

न्यू इंग्लिश हायस्कूल, अकोलाचे शिक्षक शशिकांत बांगर यांना विदर्भात प्रथम, राज्यात द्वितीय क्रमांकाचा मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

राशिफल

आज का मौसम

आज का मौसम

शेयर बाज़ार लाइव